सोसाट्याचा वारा अणि भयाण पावसाची ती अनोल्खी रात्र होती. रात्रीचे १०.१५ वाजले होते . एस टी च्या बसची वाट बघत मी बाक्द्यावार एकटाच होतो. भोवताली होता तो किर्र अंधार अणि पावसाचा आवाज. शेवटची बस नश्कातुन निघाली आहे एवढाच निरोप मिळाला होता.
इथून सुमारे ७० मैलावर हे गाव होते - जयधार. २१ कुटुम्बं अणि एक प्राथमिक शिक्षण पुरवण्या योग्य एक आश्रम. नदीच्या काठी बसलेले हे गाव आपल्यातुनच एक गूढ़ होते. भूत , जादू- टोना अणि अनेक अश्या भाकड गोष्टी मी इथल्या प्रवाश्यां कडून ऐकल्या होत्या. हे स्वतः आपल्या डोळ्यानी पहिल्या अणि अनुभवल्या शिवाय माझा ह्या गोष्टीनवर विश्वास बसणार नव्हता.
एस टी चा बस पोहोचला शेवटी अणि मी आत शिरलो. " कुठे जायचे आहे ? कंडक्टरनी विचारले. एक जयधर द्या अणि ५० ची नोट त्याच्या हातात दिली. बस मध्ये आम्ही तिघेच अणि आणखी कोणी असण्याची शक्यता तशी फार कमीच होती. पाउस पडताच होता.
१२ वाजता मी पोहोचलो. " साहेब रात्री अपरात्री बाहेर पडू नाका " बस मधून उतरताना कंडक्टरनी माला बजावले . फार काही ह्या गोष्टीचा गंभीर विचार न करता मी गावाकडे चालू लागलो. पाउस आता थांबला होता पण गावत वीझ नव्हती. माझी राहण्याची सोय आश्रमात झाली होती. आश्रम नदी ओलांडून १ मैलावर होता . समोर त्या गर्द अंधारात काही दिवे पेटले होते. रात किद्यांची किर्र किर्र, लांडग्यांच्या भूंख्न्य्चा आवाज माझ्या समोर एक आस्वस्थ करणारे चित्र निर्माण करत होते. भीती सावरून मी आश्रमाकड़े पट -पट चालू लागलो.
आश्रमात पोहोचताच मी सुटकेचा श्वास घेतला. समोर एक मोठा सभामंडप होता. दोन कोपर्यात दोन कंदील थोडा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होते. सभामंदापच्या मागच्या डाव्या कोप्रयातुन एक जुनाट लाकडी जीना पहिल्या मजल्यावर जात होता. तिथेच माझी रूम होती . पहिल्या पायरीवरुन वर बघतांना हृदयाचा एक ठोका चुकवा असे दृश्य होते. गर्द अंधार , अंगाला बोचणारी ठंडी अणि ओलसर कुंद वातावरण. भूक नव्हती पण पाय थकले होते अणि मी कसला ही विचार न करता पलंगावर आडवा झालो.
अचानक एका गगनभेदी किंकाळीने मला जाग आली.. मध्यरात्री ३ वाजले होते...हातात मोठा टॉर्च घेउन मी जीन्याकडे धावलो...
to be contd.
No comments:
Post a Comment