Copyright

Protected by Copyscape Web Plagiarism Software

Sunday, October 2, 2011

काय मागावे परी म्या , तूही कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे !



पाखरं जशी मोठी झाली की आपल्या जीवनाचा शोध लावण्यासाठी आपली घरटी सोडतात तसे मूलभूत शिक्षण मिळाल्यावर आपणही घर सोडतो. मुग कोणी उच्च-शिक्षणासाठी किंवा नौकरी-धंद्यासाठी आई-वडिलान पासून दुर , बहिण-भावंडान पासून दुर , मित्रां पासून दुर- केवळ आयुष्याची व्याख्या समजून घ्यायाला, जीवनाच्या ह्या प्रदीर्घ प्रवासाला निघतो.  या मिळतात आपल्याला नवीन मित्र, नवीन नाती , काही आयुष्यभर सोबत राहतात तर काही खूप काही शिकवून जातात- मागे राहतात तर फक्त आठवणी काही चांगल्या - काही वाईट . असो, हा प्रवास चालतच राहतो . घरून निघतांना आपल्या खिशात एक दमडा देखील नसतो , असतो तर फक्त आत्मविश्वास - सगळा जग जिंकण्याचा. स्वतःशी आपण एक निश्चय करतो: 

स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहात मी म्हंटले 
'माझे नशीब मीच घडवीन'
तेव्हा डोक्यावरचे आभाळ पोक्तपणे हसले - म्हणाले 
'ठीक आहे मी पण इत्याकताच कोसळणार नाही' 


मित्रानो आपल्या आत्मविश्वासाला धक्का देणारी वळणं नक्कीच येतात या प्रवासात - पण जणू काही एक अभेद्य कवच आपल्या भोवती असल्या सारखे , आपल्याला त्याची जाणीव देखील होत नाही. कधी हाच आत्मविश्वास आपल्याला विनासायासाने मिळालेल्या यशाने मग्रूरी देखील आणतो आणि इथूनच सुरु होते अपयशाच्या दिशेचेची वाटचाल.


भरभराटीच्या प्रखर प्रकाशात आपण हे विसरतो की हे आपल्या भोवतालचे अभेद्य कवच आपल्याला आपल्या आई-वडिलांचे वरदान व आपल्या मातृभूमीचे आश्रयदान आहे , ह्याचं आपल्याला देणं नक्कीच लागता आणि तेही ह्याच आयुष्यात. देणार्यानी ह्यांच्याच रुपात आपल्याला हे सर्वस्व दिलं आहे ..शेवटी, किती मागणार आणि काय मागणार -  काय मागावे परी म्या , तूही कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे!

No comments: