Copyright

Protected by Copyscape Web Plagiarism Software

Monday, October 25, 2010

अश्वम नैवं , गजम नैवं , व्याघ्रां नैवाचा नैवाचा . अजापुत्रं बळी दधातू , देवो दुर्बल घातकः

ह्या अतिशय कठोर आणि आत्मविश्वासाला धक्का पोहोचवणाऱ्या वरील शब्दांचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहीत असेल , तरीही ह्याचा आर्थ " अश्वम नैवं ( घोड्याचा नाही ), गजम नैवं ( हत्तीचा नाही , व्याघ्रां नैवाचा नैवाचा ( वाघाचातर नाहीच नाही ) . अजापुत्रं बळी दधातू ( बोक्डाच्याच पिल्लाचा बळी दिला जातो ) , देवो दुर्बल घातकः ( देव हा सुद्धा दुर्बलाचाच घातक आहे ).

कालचीच घोष्ट आहे , मी आणि माझा खूप जवळचा मित्र सिनेमा बघायला गेलो . " रक्तचरित्र " हा बघायचं ठरविले. तशे वीस एक मिनिटे उशिराच पोहोचलो पण ठीक आहे असाही काही आम्ही जन्म मरणाचा फेरा चुकवला नाही..हिंदी चित्रपट तो उलट बघाकी सुरुवातिपसून सगळं सारखच. पहिले १५ मिनिटातच ते थरार नाट्य बघून पोटात मुरडा आला. इतका भीषण आणि बेधडक रक्तपात मी आजवर कधी स्वप्नात पण पहिले नव्हते.


राजनीती आणि वर्चस्व असे हे अविभाज्य घटक पुन्हा एकदा आजून जमतील तेवढे विकृत पद्धतीने RGV ने आपल्या सामोरे आण्याचा प्रयत्न केला आहे. काळ आणि गरज माणसाला कुठे नेउन पोहोचवते ह्याचे भान त्याला देखील जाणवत नाही. द्वेष , बदल्याची भावना आपल्याच जवळच्यानचा जीव घेण्याला भाग पाडते , ह्याहून अधिक वाईट काही कल्पना नाही करू शकत आपण.

अखेरीस , दुर्बलाचच घात होतो आणि जन्माला येतो आजून एक ज्वालामुखी जो तळतळतो आहे त्या दुर्बळ घटकचा संहार करायला. तो दुर्बळ आता दुर्बळ नाही तर तो घातका पेक्षा अधिक बलवान आहे. हे ऐकून ऐकून माझया डोक्याचे भजे झले आहे.

हा कुठल्याही प्रकारे कौटुंबिक चित्रपट नाही आहे , कृपया ह्याची नोंद करून घावी आणि आपल्या मैत्रिणीला तर हा चित्रपट दाखवण्याचे धाडस कदापी कारू नये .:)

1 comment:

Unknown said...

lolzzz.....
good use of phrase & words sanky...
very nice :)